Pune Crime | पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह दोघांवर FIR, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिनेमाच्या प्रदर्शनासाठी लावण्यात आलेला इलेक्ट्राॅनिक पडदा (स्क्रीन) अचानक अंगावर पडून 3 लहान मुले जखमी झाल्याची घटना सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पद्मावतीमध्ये तळजाई वसाहतीत शुक्रवारी रात्री घडली होती. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नगरसेवक सुभाष जगताप (Corporator Subhash Jagtap) तसेच एका टेम्पोचालकाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. थेट नगरसेवकास जबाबदार धरत गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रांजल विजय आदमाने (वय 6), अनुष्का विशाल रणदिवे (वय 6), सौरभ जालिंदर पाटोळे (वय 7, सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेला जबाबदार ठरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप ( NCP Corporator Subhash Jagtap) तसेच एका टेम्पोचालकाविरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

PC संतोष कराड यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तळजाई वसाहतीत एका सिनेमाच्या प्रदर्शनासाठी इलेक्ट्राॅनिक पडदा लावण्यात आला होता.
पडद्याला विद्युत पुरवठा करण्यासाठी एका रोहित्रातून बेकायदा वीजजोड (Pune Crime) घेण्यात आली होती.
दरम्यान, एका टेम्पोने पडद्याला धडक दिली त्यानंतर पडदा कोसळला. पडद्याच्या समोर बसलेली तीन लहान मुले जखमी झाली.
जखमींपैकी एका लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अशी माहिती समोर आली आहे.

नगरसेवक सुभाष जगताप (Subhash Jagtap) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Pune Crime | FIR against two including NCP corporator Subhash Jagtap at Sahakarnagar police station in Pune; Know the case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी तर ड्रायव्हर फरार

Digital Payment | WhatsApp च्या ‘विजया’ मुळं आता PhonePe, Google Pay ला मोठी टक्कर ! 4 कोटी युजर्सची लिमिट वाढणार, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Ananya Pandey | अनन्याच्या बोल्ड ‘बिकिनी लूक’नं चाहत्यांना केलं घायाळ, फोटो व्हायरल