Pune Crime | ‘थांब तुला खल्लास करतो’ म्हणत तरुणावर केला ‘बेछूट’ गोळीबार, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका टोळक्याने तरुणावर दोन गोळ्या (Firing In Pune) झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची धक्कादयक घटना पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी येथे घडली आहे. तसेच या टोळक्याने हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) 11 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील शिव शंकर सोसायटी (Shivshankar Society) मध्ये शनिवारी (दि.6) रात्री 11 च्या सुमारास घडला आहे.

 

सौरभ सरवदे (Saurabh Sarvade), रुपेश सोनवणे उर्फ डिजे (Rupesh Sonawane alias DJ), निलेश सोनवणे (Nilesh Sonawane), गणेश जगदाळे (Ganesh Jagdale), बाबा बडबडे (Baba Badbade), अनिल कांबळे (Anil Kamble) व त्यांचे इतर 5 ते 6 साथिदारांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित कैलास थोपटे Amit Kailas Thopte (वय-32 रा. शिव शंकर सोसायटी, गल्ली क्र.2 बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांच्यामध्ये शुक्रवारी (दि.4) वाघजाई मंदिर (Waghjai Temple) येथे भांडण झाले होते. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास फिर्यादी हे त्यांचा भाऊ अमोल थोपटे, गणेश मोडावत व गल्लीतील इतर 4 ते 5 जण गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी वाघजाई मंदिर येथे झालेल्या भांडणाच्या करणावरुन दुचाकीवरुन हतात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन आले. आरोपींनी शिवीगाळ करुन ‘थांब तुला खल्लास करतो’ असे म्हणत पिस्टलमधून (Pistol) फिर्यादी यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरडा ओरडा करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन पितळी पुंगळ्या जप्त केल्या.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande), बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware), पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar), सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळूखे (API Pravin Kalukhe), पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे (PSI Vikrant Dige), पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग (PSI Sanjay Adling) यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Firing incident near Shivshankar Society of Bibvewadi police station Limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात आईनेच विकले 4 वर्षाच्या मुलाला अन् रचला अपहरणाचा बनाव; पोलीस तपासात फुटले बिंग; 8 जणांना अटक (व्हिडीओ)

 

पुढील वर्षी लाँच होईल भारताचा Digital Rupee, ट्रेडिशनल करन्सीपेक्षा वेगळे नसेल; जाणून घ्या

 

Suryadatta Education Foundation | नितिन गडकरी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार-२०२२’ प्रदान; केंद्रीय मंत्री म्हणाले – ‘तळागाळातील लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे’