Pune Crime | चव्हाणनगर, शंकर महाराज वसाहत परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime| किरकोळ कारणावरुन किंवा परिसरात दहशत माजवण्यासाठी गुन्हेगारी टोळीकडून (Criminal Gang) वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) केली जाते. पुण्यात (Pune Crime) वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakarnagar Police Station) हद्दीतील चव्हाणनगर, शंकर महाराज वसाहत (Shankar Maharaj Colony) परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अशा प्रकारच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

मागील काही दिवसांत वर्चस्व वादातून आणि परिसरात दहशत कायम ठेवण्यासाठी गुंडांनी हातात हत्यारे घेऊन त्याचा इन्स्टाग्रामवर (Instagram) रिल्स व्हिडीओ (Reels Video) बनवून तो व्हायरल केला होता. हा प्रकार ताजा असताना ही तोडफोडीची घटना घडली असून, सामान्य नागरिकांना पुन्हा वेठीस धरण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

या घटनेबाबत नागरिकांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | five to six vehicles were vandalized by some unidentified persons in chavan nagar shankar maharaj vasahat of sahakarnagar police station limits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Q4 Results | एलआयसीच्या नफ्यात झाली घसरण, गुंतवणुकदारांना मिळेल इतका लाभांश

 

HotStock Alerts | सीधा सौदा : असे स्टॉक्स ज्यामध्ये ट्रेड घेऊन तुम्ही करू शकता दमदार कमाई

 

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी