Pune Crime | पुण्यात विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 7.73 लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना (Unlicensed) आणि बनावट सौंदर्य प्रसाधनांचे (Cosmetics) उत्पादन करुन त्याची विक्री करणाऱ्या पुण्यातील एका कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) कारवाई केली. यावेळी 7 लाख 73 हजार रुपयांचा साठा जप्त केला. पुण्यातील वाकड (Wakad) येथील मे. ग्रूमिंग इंटरप्राईस प्रा. लि. (Grooming Enterprise Pvt. Ltd.) कंपनीत मंगळवारी (दि. 24) ही कारवाई (Pune Crime) करण्यात आली.

 

कंपनीने विनापरवाना बनावट शाम्पू (Shampoo), कंडिशनर (Conditioner), बियर्ड वॉश (Beard Wash), हेअर ट्रीटमेंट (Hair Treatment) व विविध केरेटीनयुक्त (Carotene) सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करुन विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. औषध निरीक्षकांनी 7 लाख 73 हजार रुपयांची सौंदर्य प्रसाधने व त्यांच्या उत्पादन करण्याकरीता लागणारा कच्चा माल, पॅकिंग मटेरियल, बॉटल्स, लेबल्स इत्यादी साहित्य जप्त केले आहे.(Pune Crime)

औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादनासाठी नमुना Cos 8 मध्ये परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना उत्पादन करणे कायद्याने गुन्हा (Crime) आहे. विनापरवाना उत्पादन करु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून उत्पादन परवान्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आवाहन सह आयुक्त (औषधे) एस. बी. पाटील (Joint Commissioner (Medicines) S.B. Patil) यांनी केले आहे.

 

ही कारवाई सहायक आयुक्त के. जी. गादेवार (Assistant Commissioner K.G Gadewar),
औषध निरीक्षक महेश कवटीकवार (Drug Inspector Mahesh Kavtikwar),
अतिश सरकाळे (Atish Sarkale), रझीया शेख (Razia Sheikh) यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Food and Drug Administration cracks down on unlicensed counterfeit cosmetics company in Pune stocks worth Rs 7.73 lakh seized

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा