Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेअर ट्रेडींगमध्ये पैसे गुतवल्यास (invest in stock trading) जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) 43 वर्षीच्या व्यक्तीची 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एप्रिल 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीत पुण्यातील (Pune Crime) वारजे माळवाडी (Warje Malwadi) येथील पॉप्युलर नगर येथे घडला आहे. याप्रकरणी एका मोबाईल धारकावर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वारजे माळवाडी येथील 43 वर्षाच्या व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 8291023608 या मोबाईल क्रमांक धारक राहुल आचार्य (Rahul Acharya) याच्याविरोधात फसवणूक (Fraud) आणि आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, फिर्यादी यांना एका क्रमांकावरुन फोन आला. समोरील व्यक्तीने राहुल आचार्य बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना शेअर ट्रेडींग मध्ये पैसे गुंतवल्यास जास्त परतवा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून फोरेक्स ट्रेडींग कंपनीमध्ये (Forex Trading Company) पैसे गुंतवण्यास सांगून 15 लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर आरोपीने कोणताही परतावा (Refund) दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | पुण्याच्या विमाननगरमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा; 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

MSRTC Electric Buses | आता लवकरच धावणार इलेक्ट्रिक एसटी ! पुण्यातून औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि महाबळेश्वरचा प्रवास होणार ‘सुखद’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Fraud of Rs 15 lakh by asking to invest in a forex trading company

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update