Pune Crime | विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगून 3 लाखाची फसवणूक, दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  एचडीएफसी लाईफ कंपनीच्या (HDFC Life Company) कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन करुन पुण्यातील (Pune Crime ) 56 वर्षीय व्यक्तीची 3 लाखाची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत दोन जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) आयटी अ‍ॅक्टनुसार (IT Act) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2021 दुपारी चारच्या सुमारास पाषाण येथील सुस रोड वरील (Sus Road Pashan) वरदायिनी सोसायटीत घडला आहे.

पोलिसांनी 9763856405, 8448016113 मोबाइल धारक पंकज शर्मा (Pankaj Sharma) आणि 9911630147 मोबाइल धारक राजीव गुप्ता (Rajiv Gupta) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हेमंत शरचंद्र साठ्ये Hemant Sathye (वय-56 रा. 1 अर्थ अपार्टमेंट, 72 वरदायिनी सोसायटी, सुस रोड, पाषाण, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुलै महिन्यात फिर्यादी यांना वारंवार फोन करुन लिंक पाठवून एचडीएफसी लाईफ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन हेमंत यांना 2 लाख 97 हजार रुपयांचा वार्षिक हप्ता लॉकडाऊनमुळे (Lockdown) ईसीएस (ECS) होणार नसल्याचे सांगितले.
तसेच त्यांना ई-मेल वर लिंक पाठवून लिंकवर क्लिक करायला सांगितले.

हेमंत यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर आरोपींनी 2 लाख 97 हजार रुपयाची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर (Online transfer) करुन घेतले.
हेमंत यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार लांबतुरे (Police Inspector (Crime) Vijaykumar Lambature) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 3 lakh for speaking from insurance company, FIR against both

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत; 14 जणांवर FIR

Covid-19 | जगातील सर्वात विषारी साप वाचवणार मनुष्याचा जीव, कोरोना व्हायरसविरूद्ध ’रामबाण’ ठरले विष

Earn Money | अवघ्या 5 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल लाखो रूपयांची कमाई !