Pune Crime | शेअर मार्केट मधील गुंतवणूकीवर जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून 60 लाखांची फसवणूक, 5 जणांविरुद्ध FIR

0
243
Pune Crime | Fraud of Rs 60 lakh for lucrative investment in stock market, FIR against 5
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर (Stock Market Investment) जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक (Cheating) करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. असाच एक प्रकार पुण्यातील (Pune Crime) औंध (Aundh) मध्ये घडला आहे. शेअर मार्केटसाठी गुंतवणूक करण्यास सांगून एका व्यक्तीची 60 लाख 88 हजार 936 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) देवीका कुलकर्णी (Devika Kulkarni), समर सक्सेना (Samar Saxena), अनुराग (Anurag), अमित (Amit), देवयानी नारंग (Devyani Narang) यांच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपींविरुद्ध आयपीसी 420, 419, 406 आयटी अॅक्ट (IT ACT) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ADV

 

याबाबत औंध परिसरात राहणार्‍या 39 वर्षीय व्यक्तीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 ऑगस्ट 2021 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फोन करुन गॅलक्सी ट्रेडर्स कंपनीतून (Galaxy Traders Company) बोलत असल्याचे सांगितले.
आरोपींनी त्यांच्या कंपनीमध्ये शेअर मार्केटसाठी गुंतवणूक केल्यास 10 टक्के नफा (Profit) देण्याचे आमिष दाखवले.(Pune Crime)

 

आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना गॅलक्सी ट्रेडर्स कंपनीत 60 लाख 88 हजार 936 गुंतवण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे गुंतवले. पैसे गुंतवल्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे 10 टक्के नफा न देता आणि फिर्यादी यांनी गुंतवलेले पैसे परत न करता फसवणूक केली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे
(Senior Police Inspector Rajkumar Waghchaure) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 60 lakh for lucrative investment in stock market, FIR against 5


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tara Sutaria Hot Photos | ‘हाय गर्मी…’ कडक उन्हात आणखी हॉट झाली तारा सुतारिया..

Pune Municipal Corporation (PMC) Election | पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मेला जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Stock To Buy Today | 310 रुपयांच्या पुढे जाईल टाटा ग्रुपचा हा मल्टीबॅगर शेअर,
आता स्वस्तात मिळत आहे स्टॉक, एक्सपर्टने म्हटले – खरेदी करा

Neha Sharma Superhot Look | नेहा शर्माच्या हॉटनेसमुळं चुकला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका, पाहा व्हायरल फोटो..

Bold Web Series | प्रसिद्ध अभिनेत्रीनं अनेक वेब सिरिजमध्ये ओलांडल्या स्वत:च्या सर्व मर्यादा, बोल्ड फोटो पाहताच तुम्हीही ‘या’ अभिनेत्रीचं नाव विचाराल..