Pune Crime | धायरीत गुंडांच्या टोळक्याचा हैदोस, तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; मोटारीच्या काचा फोडून पसरविली दहशत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रात्र झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर नेमके कोणाचे राज्य असते, असा प्रश्न पडावा, अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहे. एखादे टोळके गाड्यांवरून आरडाओरडा करीत येते. दिसले त्याला मारहाण (Beating) करुन गाड्यांची तोडफोड (Vehicle Vandalism) करुन निघून जातात. परिसरात दहशत माजविण्यासाठी सातत्याने तोडफोड करण्याचे प्रकार पुण्यात (Pune Crime) होताना दिसत आहेत.

 

धायरी (Dhayari) येथे एका गुंडांच्या टोळक्याने तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले (Robbed) व परिसरातील 3 चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. दोन घरांवर दगडफेक करुन खिडकीच्या काचा फोडल्या. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) योगेश चव्हाण (Yogesh Chavan), आदेश बानेकर (Adesh Banekar), दत्ता मरगळे (Datta Margale), निखील शिरसाट (Nikhil Shirsat) तसेच त्यांच्याबरोबरच्या 8 ते 10 साथीदारांवर दरोड्याचा (Robbery) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी यज्ञेश ऊर्फ युवराज बंडु पोकळे Yagnesh alias Yuvraj Bandu Pokale (वय 26, रा. पदमावती पार्क सोसायटी, गणेशनगर, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना धायरीतील गणेशनगर मधील पद्मावती पार्क सोसायटी (Padmavati Park Society) तसेच महादेवनगर परिसरात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
फिर्यादी व त्यांचे मित्र रोहित हे रस्त्याने गप्पा मारत चालले असताना मोटारसायकलवरुन आरोपी आले.
त्यांनी रोहितच्या कानाखाली मारली. निखील शिरसाट याने शिवीगाळ केली.
योगेश चव्हाण याने फिर्यादी याच्या गळ्याला कोयता लावला. आदेश बानेकर याने त्याच्या खिशातील 3 हजार 745 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तक्रार दिली तर, तुला सोडणार नाही, अशी धमकी (Threat) दिली.
तसेच या गुंडांनी तेथे लावलेल्या 3 चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या. दोन घरांवर दगडफेक करुन त्यांच्या खिडक्याचा काचा फोडून परिसरात दहशत पसरवली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले (API Thorbole) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | gang of thugs in Dhayari robbed the youth by showing fear of the scythe; Panic spread by breaking car glass

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा