Pune Crime | गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 35 लाखांचा गुटखा जप्त, तीन जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याचा (Gutakha) मोठा साठा गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकच्या (Anti Narcotic Cell) पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या कारवाईत तिघांना अटक (Arrest) करण्यात आली असून त्यांच्याकडून 35 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.1) कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील वडाचीवाडी येथे (Pune Crime) करण्यात आली.

 

सुरेशकुमार पोमाराम भाटी Sureshkumar Pomaram Bhati (वय – 36), सुरेश पोखराज सोळंके Suresh Pokhraj Solanke (वय – 32 दोघे रा. गल्ली नं. 3 शिवशंभोनगर, काकडे वस्ती, कोंढवा – खुर्द, पुणे), विक्रम मिस्त्रीलाल राव Vikram Mistrilal Rao (वय – 34 रा. वडारवस्ती आळंदी रोड, विश्रांतवाडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे त्यांच्या पथकासह गस्त घालत असताना, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाचीवाडी (Vadachiwadi) येथे एका ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत तंबाखुजन्य पान मसला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला आहे. तसेच तो सर्व माल तेथून विक्रीसाठी हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वडाचीवाडी येथे छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी गोडाऊन आणि वाहनातील 34 लाख 83 हजार 200 रुपयांचा गुटखा जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, संदिप जाधव, राहुल जोशी,
मनोज साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Gutka worth Rs 35 lakh seized from pune police crime branch anti narcotics cell three arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा