Pune Crime | दुर्देवी ! ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार होमगार्डचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक (truck collision) एका दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरील होमगार्डचा (home guard) मृत्यू झाला. हा अपघात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील निगडी येथील पवळे ब्रिजवर (Pavle bridge nigdi) रविवारी (दि.12) सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. अपघातानंतर (Pune Crime) ट्रकचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला.

 

तेजस ओमप्रकाश लेले Tejas Omprakash Lele (वय-32 रा. माळीनगर, वडगांव मावळ, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या होमगार्डचे नाव आहे. याप्रकरणी तेजसचा आत्येभाऊ देवेंद्र अरुण कुरुमभट्टी Devendra Arun Kurumbhatti (वय-35 रा. गणेश हौसिंग सोसायटी, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) याने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस हे होमगार्ड होते.
ते निगडी येथील पवळे उड्डाणपुलावरुन रविवारी (दि.12) सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीवरुन (MH 14 JV 1475) जात होते.
त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक तेजसच्या दुचाकीला बसली.
यामध्ये तेजस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | home guard killed truck collision truck driver absconded after accident in pimpri chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा