Pune Crime | हॉटेलचालकाकडून 6 लाखांची खंडणी उकळणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | हॉटेलचालकाचे अपहरण करून त्याला आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत 6 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीस हवेली पोलिसांनी (Haveli Police) अटक केली. न्यायालयाने त्याला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली (Pune Crime) आहे.

आदित्य रोहिदास साळुंखे (वय 24, रा. साई सोनाई कॉम्प्लेक्स, शिंदे पूल, शिवणे) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी यापूर्वी सागर सुनिल शिरवाळे (वय 31, नांदेडफाटा), महेश उर्फ बबल्या तानाजी नलावडे (वय 25, रा. निगडे, ता. वेल्हे) आणि गजानन विलास मोरे (वय 26, रा. न-‍हे ) यांना अटक केलेली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी उदय शेट्टी (वय 43, रा. वडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खडकवासला गावच्या हद्दीत डी.आय.ए.टी. प्रवेशव्दाराजवळ तसेच कोंढवा खडीमशीन चौक येथे 30 आणि 31 ऑगस्ट 2019 रोजी ही घटना घडली होती.

 

 

फिर्यादींच्या दुचाकीस पाठीमागून धडक देत ते खाली कोसळल्यानंतर आरोपींनी मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर बेदम मारहाण करीत 80 लाख रूपये खंडणी ची मागणी केली.
तसेच कुटुंबियांना कॉल करून खडीमशीन चौक येथे बोलावून घेत सहा लाख रूपये खंडणी स्विकारून फिर्यादीची सुटका केली होती.
याप्रकरणात तपास करून जानेवारी 2021 मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
आरोपी आदित्य साळुंखे हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे दोन वर्षापासून फरार होता. या काळात त्याने कोेठे वास्तव्य केले.
खंडणीच्या गुन्ह्यांत आरोपी आदित्य याला दीड लाख रूपये वाटणी मिळाली आहे ती त्याच्याकडून हस्तगत
करणे व गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सहायक सरकारी
वकील विजयसिंह जाधव (Assistant Public Prosecutor Vijay Singh Jadhav) यांनी केली. न्यायालयाने आरोपीस ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title : Pune Crime | Hotel operator arrested for Rs 6 lakh ransom

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Kalyan Crime | धक्कादायक ! कल्याणमध्ये भरदिवसा विवाहितेची दगडाने ठेचून हत्या

Gravittus Foundation | तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी उषा काकडे यांच्या ‘ग्रॅविटस’ संस्थेचा पुढाकार