Pune Crime | पत्नीच्या औषधोपचाराच्या खर्चाच्या तणावातून पतीनं आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – आजारी पत्नीच्या औषधोपचाराच्या खर्चाच्या तणावातून पतीने आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती (Baramati) तालुक्यात घडली आहे. बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथील मनोहर संभाजी कुतवळ Manohar Sambhaji Kutwal (वय-35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (commits suicide) केली. ही घटना आज सकाळी (Pune Crime) उघडकीस आली.

पुण्यातील (Pune Crime) एका प्रसिद्ध रुग्णालयात पत्नीवर उपचार सुरु होते. रुग्णालयाकडून पैसे भरण्यास सांगितले जात होते. मात्र, पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने मनोहर तणावात होते. त्यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करुन रुग्णालयात भरले होते. परंतु अजून रक्कम जमा करण्यास रुग्णालयाने सांगितले. यानंतर आज पहाटे एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

मयत मनोहर यांचे चुलते दत्तात्रय कुतवळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे (Sunilkumar Musle) यांच्या संपर्कात होते. संबंधित रुग्णालयाला बिल कमी करण्याबाबतची प्रक्रिया सुरु असतानाच मनोहर यांनी टोकाचे पाऊल उचलले.

या घटनेनंतर सुनीलकुमार मुसळे यांनी ही परिस्थिती सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के (Co-Charity Commissioner Sudhir Kumar Bukke) यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने संबंधित रुग्णालयात जाऊन महिलेच्या उपचाराचे संपूर्ण बिल माफ करण्याचे निर्देश दिले. स्वत: सह धर्मदाय आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून थेट दवाखान्यात येत यंत्रणेला (Pune Crime) सूचना दिल्या.

 

टोकाचा निर्णय घेऊन नका

दवाखान्याच्या बिलासंदर्भात कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये. काही अडचण असल्यास धर्मदाय आयुक्तांसोबत चर्चा करावी.
पुणे, सातारा, सोलापूर, नगर या चार जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त दवाखाने धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येतात.
या मध्ये काहीतरी मार्ग काढता येतो. पण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कोणही घेऊ नये,
असे आवाहन सह धर्मदाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | husband commits suicide stress over wifes medical expenses in baramati of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parambir Singh |’गायब’ झालेल्या परमबीर सिंह यांचा सुगावा लागला, ‘या’ शहरात असल्याची माहिती?, असा सापडला पत्ता

Aurangabad Crime | लग्नानंतर 8 महिन्यातच महिला इलेक्ट्रिक इंजिनिअरची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना

Mumbai Cruise Drugs Case | चौकशीला जाण्याआधी अभिनेत्री अनन्या पांडेंची मोठी ‘गेम’; NCB अधिकारीही गोंधळात