Mumbai Cruise Drugs Case | चौकशीला जाण्याआधी अभिनेत्री अनन्या पांडेंची मोठी ‘गेम’; NCB अधिकारीही गोंधळात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Cruise Drugs Case | मुंबईच्या समुद्रात क्रूझवर अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मोठी छापेमारी करत ड्रग्ज पार्टीचा (Mumbai Cruise Drugs Case) पर्दाफाश केला होता. त्यात बॉलिवूड अभिनेता (Shah Rukh Khan) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अनेकांना एनसीबीने (NCB) अटक (Arrested) केली आहे. याप्रकरणात आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेना (Ananya Panday) समन्स देण्यात आला होता. गेली दोन दिवस तीची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.

 

आर्यन खानच्या मोबाईलमधून अनन्याशी संवाद साधलेला कथित चॅट समोर आला आहे. त्यात ड्रग्जचा सरळसरळ उल्लेख आहे. पण,अनन्याच्या (Ananya Panday) मोबाईलमध्ये या संबंधीचे चॅट सापडत नसल्याने एनसीबी पथकही गोंधळात पडले आहे. अनन्या पांडेने अनेक जणांसोबत केलेले चॅट डिलीट केल्याचा संशय एनसीबीला (NCB) आला आहे. तर, तिने आर्यनसोबतचे चॅटही चौकशीला येण्याआधी किंवा आर्यनला अटक केल्यानंतर अडकण्याच्या शक्यतेने डिलीट केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एनसीबीने तिचे 2 मोबाईल, लॅपटॉपसह तिच्या 7 इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी (Mumbai Cruise Drugs Case) पाठविले आहेत.

तर, अनन्या हिचे इतर लोकांशी झालेले मेसेजिंग, अन्य माहिती शोधण्यात येणार आहे. अ‍ॅक्ट्रेसने चौकशीला सामोरे जाण्याआधी काही चॅट डिलीट केले असावेत असा या अधिकाऱ्यांना संशय आहे. याचबरोबर तिने काही कॉन्टॅक्ट डिटेलही केले आहेत. हे कॉन्टॅक्ट रिकव्हर केले जातील. एनसीबी आता फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतिक्षा करीत आहे.

 

अनन्याने चौकशीत म्हटले की, ड्रग्ज कधी घेतले नाही, मात्र सिगारेट ओढलीय.
तसेच अनन्याच्या चॅटमध्ये मी एकदा गांजा ट्राय केल्याचे म्हटले आहे व पुन्हा गांजा ओढायचा आहे, असे म्हटले आहे.
तसेच दोघांमध्ये ड्रग पेडलरचे नंबरही शेअर झाले आहेत. दरम्यान, यामुळेच अनन्याला सोमवारी चौकशीला बोलविण्यात आले आहे.
2 दिवसांत फॉरेन्सिक टीम अहवाल देईल, या अहवालावरच अनन्या पांडेची चौकशी केली जाणार आहे.

 

Web Title :- Mumbai Cruise Drugs Case | aryan khan mumbai cruis drug case ananya panday deleted whatsapp chats ncb enquiry visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | आर्थिक दुर्बल आरक्षण ! ‘आठ लाख उत्पन्नाचा आकडा कशाच्या आधारे निश्चित केला? निकष सांगा, अन्यथा आरक्षण रोखू’

RTO Registration Certificate | RTO चा नवा नियम ! वाहन खरेदीनंतर नोंदणीसाठी आरटीओमध्ये जाण्याचे हेलपाटे थांबणार

Earn Money | ‘या’ वनस्पतीची लागवड करून करा लाखोंची कमाई ! सरकार देखील देतंय अनुदान, जाणून घ्या