Pune Crime | घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घृण खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती वादातून (Domestic Dispute) पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण खून (Wife murder) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी पिंपरी पोलिस ठाण्याच्या (Pimpri Police Station) हद्दीतील नेहरुनगरमध्ये घडली. पत्नीचा खून केल्यानंतर (Pune Crime) आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जिनाब अजमुद्दीन चाकोरे Jinab Azamuddin Chakore (वय-35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अजमुद्दिन अल्लाउद्दीन चाकोरे (वय-38 रा. नेहरुनगर पिंपरी) याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जिनाब आणि आरोपी अजमुद्दीन यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबीक वाद सुरु होते. याच वादातून आरोने आज सकाळी जिनाब यांच्या डोक्यात पाटा घालून खून केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जिनाब यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू (Pune Crime) झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पुढील तपास पिंपरी पोलीस (Pimpri Police) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | husband kill his wife using stone in pimpri chinchwad pimpri police arrest husband

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍याला 5 लाखाच्या खंडणीची मागणी; 4 लाख घेताना तिघांना खंडणी विरोधी पथकानं पकडलं

Universal Pension System | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय अन् पेन्शनची रक्कम, मोदी सरकार करतंय विचार, जाणून घ्या

LPG Subsidy | खुशखबर ! स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये 237 रुपये ट्रान्सफर, ‘इथं’ तपासून पहा?