Pune Crime | कॉलेजच्या फी भरण्यावरुन वादात विद्यार्थ्याने दरवाजाच्या काचेवर डोके आपटून केले स्वत:ला जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | कॉलेजची फी भरण्याची एपत नाही. फी माफ करावी, अशी मागणी करण्यावरुन प्राचार्यांशी झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याने दरवाजाच्या काचेवर स्वत:चे डोके आपटून स्वत: जखमी करुन घेतले. ही घटना पिंपरी वाघेरे येथील महात्मा फुले महाविद्यालयात २९ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता (Pune Crime) घडला.

याप्रकरणी महाविद्यालयाचे परिचर सुरेश देसाई यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी एका २४ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
हा तरुण महात्मा फुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. कॉलेजची फी भरण्यावरुन त्याचे व प्राचार्य यांच्यात बोलणे चालू होते.
तेव्हा या तरुणाने फि भरण्यास असमर्थता दर्शवित फी माफ करावी, अशी विनंती केली.
त्यावरुन वाद झाल्याने त्याने दरवाजाच्या काचेवर स्वत:चे डोके आपटून घेतले.
दरवाजा काच फुटून त्याला लागली असून त्यात हा तरुण जखमी झाला (Pune Crime) आहे.

 

Web Title : Pune Crime | In a dispute over payment of college fees, the student hit his head on the glass of the door and injured himself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Cooperative Society Elections | राज्यातील साडेचौदा हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार; पुण्यातील हजार संस्थांचा समावेश

Reality TV Show | ‘या’ ठिकाणी 21 रात्र नग्नावस्थेत जंगलात रहावं लागतं जोडप्याला, तुम्हाला माहितीय का विचित्र रिअ‍ॅलिटी शो?

Mumbai High Court | कोवळ्या वयात मुलांना आईची गरज; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण