Pune Crime | पुण्यात वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी गाडी घेऊन जाऊन केली फसवणूक

पुणे : Pune Crime | वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी कार मागून घेऊन गेला. त्यानंतर ४ महिने झाल्यानंतरही ती परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) अंबर अनिब चॅटर्जी Amber Anib Chatterjee(रा. चिंचवडी) आणि मामिन शेख यांच्याविरुद्ध फसवणूकीचा (Cheating Case) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याबाबत सागर रामचंद्र इसवे (वय ३३, रा. लोणीकंद) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ५४२/२१) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर उसवे आणि अंबर चॅटर्जी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
चॅटर्जी याने वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिकला (Nashik) जायचे आहे, असे सांगून त्यांच्याकडे चारचाकी गाडी मागितली.
वडिलांच्या उत्तरकार्यासाठी जायचे असल्याने फिर्यादी यांनी गाडी देण्याची तयारी दर्शविली.
त्यानुसार २ जून २१ रोजी दुपारी मामिन शेख हा त्यांची गाडी घेऊन गेला.
त्यानंतर फिर्यादी यांनी अनेकदा गाडी परत मागितली तरी त्यांनी गाडी परत देण्यास टाळाटाळ केली.
शेवटी ते गाडी परत देत नसल्याचे लक्षात आल्यावर इसवे यांनी फसवणूकीची तक्रार दिली आहे.

हे देखील वाचा

Parambir Singh | ‘बेपत्ता’ परमबीर सिंह आणखी ‘गोत्यात’ ! आता अटकेची टांगती तलवार

BJP MP Raksha Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरूध्द निवडणूक लढविणार्‍या भाजपच्या खा. रक्षा खडसेंना मोठा धक्का

Pune Cyber Crime | गंडविण्यासाठी सायबर चोरट्यांची अफलातून ‘आयडिया’; चित्रकाराला घातला 80 हजारांचा गंडा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | In Pune, he cheated by taking a car to bury his father’s bones

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update