Pune Crime | पुण्यात पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन आत्महत्या करुन अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणाच्या पोस्को अंतर्गत (POCSO Act) दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलविलेल्या कुटुंबाने वडगाव पोलीस चौकीत (Wadgaon Police Chowki) राडा घालून पोलिसांच्या (Pune Police) अंगावर धावून गेले. तेथील तपासाची कागदपत्रे फाडून टाकली. स्वत:लाच मारहाण करुन शिवीगाळ करुन अ‍ॅट्रोसिटी (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailja Jankar) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवींद्र संताराम उन्हाळे Ravindra Santaram Unhale (वय ३२) आणि रामदास संताराम उन्हाळे Ramdas Santaram Unhale (वय ३८, रा. वडगाव धाबाडी) यांना अटक केली आहे. तर, पूनम रवींद्र उन्हाळे Poonam Ravindra Unhale यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वडगाव पोलीस चौकीत शनिवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांच्याकडे पोक्सो अंतर्गत एका गुन्ह्याचा तपास आहे.
त्या गुन्ह्यातील चौकशीसाठी त्यांनी उन्हाळे कुटुंबाला बोलाविले होते. उन्हाळे हे भाजी विक्रेते आहे. त्याप्रमाणे हे तिघे चौकशीसाठी वडगाव पोलीस चौकीत आले होते.
त्यावेळी त्यांनी आम्हाला कशाला बोलावले. आमचा काही संबंध नाही, असे म्हणत चौकीत गोंधळ घातला.
पोलीस शिपाई माळी यांच्या अंगावर धावून धक्का देऊन त्यांच्या हातातील कायदेशीर व
गोपनीय गुन्ह्यांचे तपासाचे कागद फाडून टेबलावरील कागदपत्रे फेकून देऊन शासकीय कामात अडथळा आणला. त्यानंतर तिघेही स्वत:लाच मारहाण करु लागले.
अर्वाच्च भाषेत बोलून, अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची व आंदोलन करण्याची धमकी दिली,
त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

 

Web Title :-  Pune Crime | In Pune, they both ran over the pune police and threatened to commit suicide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Dark Knees & Elbows Remedies | ‘या’ 5 सोप्या घरगुती उपायांनी दूर करा गुडघे आणि कोपरांवरील काळेपणा; जाणून घ्या

 

Case Against Sameer Wankhede | एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा झटका ! कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1635 नवे रुग्ण, राज्याचा रिकव्हरी रेट 97.89 %, जाणून घ्या इतर आकडेवारी