Case Against Sameer Wankhede | एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा झटका ! कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Case Against Sameer Wankhede | एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Ex-Drugs Officer Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला (Illegal Bar Licence In Mumbai) असल्याच्या आरोपावरुन कोपरी पोलीस ठाण्यात (Kopri Police Station) शनिवारी रात्री वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Against Sameer Wankhede)

 

ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी (Thane Collector) काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द (Cancelled Bar Licence) केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी (State Excise Department Officer) शंकर गोगावले (Shankar Gogavale) यांनी तक्रार दाखल केली आहे. नवी मुंबई वाशी (Navi Mumbai-Washi) येथून गुन्हा वर्ग केल्यानंतर कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला आहे. (Case Against Sameer Wankhede)

समीर वानखेडे यांच्या नावावर सतगुरु हॉटेल्स या नावाने नवी मुंबईतील वाशी येथे एक बार (Sameer Wankhede Sadguru Bar) आहे.
या बारसाठी २७ ऑक्टोंबर १९९७ रोजी परवाना दिला होता. या बारचा परवाना ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे.
यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी (Nawab Malik) वानखेडे
यांच्यावर निशाणा साधून हा बार आणि रेस्टॉरंटचा परवाना समीर वानखेडे
यांना १७ व्या वर्षी दिल्याचे प्रकरण समोर आणले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे
दाखवा नोटीस बजावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Case Against Sameer Wankhede | Case Against Ex-NCB Drugs Officer Sameer Wankhede Over Illegal Bar License Navi Mumbai Washi Mumbai News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | 24 कॅरेटचे सोने देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक

 

TET Exam Scam | टीईटी प्रकरणात आणखी एका सबएजंटला अटक तर म्हाडा पेपरफुटी प्रकरणी एकाला अटक

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1635 नवे रुग्ण, राज्याचा रिकव्हरी रेट 97.89 %, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nagpur Crime | क्रिप्टो करेंसीच्या नावाखाली अनेकांची कोट्यावधीची फसवणूक, साथिदाराचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पुण्यातून अटक; 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

 

Heart Failure | ‘या’ कारणांमुळे होते हार्ट फेल ! वाचण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत