Pune Crime | बालसुधारगृहातून सुटताच कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने सपासप वार; येरवड्यातील सरगम हॉटेलजवळील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बालसुधारगृहात झालेल्या वादाचा राग मनात धरुन एका मुलाने बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने (Ax) सपासप वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना येरवडा येथील सरगम हॉटेल जवळ (Sargam Hotel Yerwada) सोमवारी (दि.4) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) मुलावर खूनाचा प्रयत्न (Attempted murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. राजेंद्र देडे Rajendra Dede (वय – 51 रा. चिखली – Chikhali) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र देडे हे बालसुधारगृहात कर्मचारी म्हणून काम करतात.
काही दिवसांपूर्वी अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.
त्याठिकाणी देडे आणि मुलामध्ये वाद (Dispute) झाले होते.
याचा राग मुलाच्या मनात होता. काही दिवसांनी बालसुधारगृहातून मुलाची सुटका झाली होती. (Pune Crime)

राजेंद्र देडे हे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हॉटेलमधून भाजी घेऊन जात होते.
त्यावेळी या मुलाने देडे यांना आडवले.
मी बालसुधारगृहात असताना तुला लई माज आला होता का, तुला दाखवतो, तुझा खेळच खल्लास करतो असे म्हणून त्याने हातातील कुऱ्हाडीने देडे यांच्या डोक्यात वार केले.
हा वार चुकवल्याने त्यांच्या हाताच्या पंजाजवळ, मनगटावर लागून देडे जखमी झाले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर (PSI Swati Thakur) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | juvenile detention center the employee was attacked with an ax and a case was registered against the child yerwada sargam hotel area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा