Pune Crime | ‘फ्रेंडशिप’साठी भर रस्त्यात धरला हात, भावांनी धु धु ‘धुतला’ ! कस्तुरी चौकातील घटनेत तरुणाला केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मैत्री करण्यासाठी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात पकडून फ्रेंडशीपची मागणी करणार्‍या तरुणाला तिच्या भावांनी धु धु धुतला. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police Station) तरुणाला अटक केली आहे. (Pune Crime)

शुभम कैलास दारवटकर Shubham Kailas Darwatkar (वय 22, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दारवटकर हा गेल्या दोन आठवड्यापासून एका मुलीच्या मागे लागला होता. ती शाळेत ये जात असताना तिच्याशी मैत्री करण्याकरीता मागे मागे येऊन तिच्याकडे एकटक लावून पहात असे. ही मुलगी शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कस्तुरी चौकातून (kasturi chowk pune) जात असताना शुभम तिच्या मागे मागे आला. ‘‘मै तुम से फ्रेंडशीप करना चाहता हू, तूम मुझसे फ्रेंडशीप करो,’’ असे म्हणून भर रस्त्यात तिचा हात पकडला. (Pune Crime)

या घटनेची माहिती या मुलीच्या भावांना समजली. ते शुभम याचा शोध घेत असताना दुपारी दीड वाजता गुरुवार पेठेतील झुंजार मित्र मंडळासमोर (Zunjar Mitra Mandal) तिघांनी त्याला गाठले. हाताने़ लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

खडक पोलिसांनी शुभम याच्यावर विनयभंगाचा गुन्हा (Molestation Case) दाखल करुन त्याला अटक केली आहे.
तर, शुभम दारवटकर याच्या फिर्यादीवरुन तिघाविरुद्ध मारामारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Khadak Police Arrest Shubham Kailas Darwatkar in Molestation Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या प्रेयसीच्या मुलाचे कल्याणीनगरमधून अपहरण; पुणे पोलिसांकडून चौघांना अटक

 

Wardha Crime | आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा यांचे पती डॉ. नीरज कदमला अटक

 

Lata Mangeshkar | गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले – ‘सर्वांनी प्रार्थना करा’