Pune Crime | पुण्यातील एच. पी ज्वेलर्समध्ये दागिन्यांवर डल्ला मारणारी महिला गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील गणेश पेठेतील एच.पी. ज्वेलर्स (H.P. Jewelers) दुकानातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या (Stealing Gold Jewelry) महिलेला खडक पोलिसांनी (Khadak Police Station) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पोलिसांनी तिच्याकडून 1 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 5 सोन्याच्या अंगठ्या (Gold Ring) जप्त केल्या (Pune Crime) आहेत. आरोपी महिलेला अंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथील राहत्या घरातून अटक केली. ही घटना 26 जानेवारी उघडकीस आली होती.

 

याप्रकरणी एच.पी ज्वेलर्सच्या मालकीन भूमिक राजेश सोनी (Bhumik Rajesh Soni) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरती (नाव बदलले आहे) नावाच्या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला फिर्यादी यांच्या दुकानात अंगठ्यांच्या काउंटरला दीड महिन्यापासून काम करत होती. 25 जानेवारी रोजी रात्री सव्वा सातच्या सुमारास आरोपी महिलेने काउंटरवरील अंगठ्यांची माहिती व रक्कमेबाबत कॉम्प्युटरमध्ये माहिती भरुन निघून गेली. (Pune Crime)

 

 

दुसऱ्यादिवशी सोनी यांनी अंगठ्यांचा स्टॉक तपासला असता त्यामध्ये 1 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 35.5 ग्रॅम वजनाच्या 5 अंगठ्या कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले असता आरोपी महिला अंगठ्या चोरत असल्याचे दिसून आले. सोनी यांनी खडक पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध फिर्याद दिली.

खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस महिलेचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार रवी लोखंडे (Ravi Lokhande) व संदिप तळेकर (Sandeep Talekar) यांना एच.पी. ज्वेलर्स दुकानात अंगठ्या चोरणारी महिला आंबेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ मंदीराजवळ राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी महिलेला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने घरात लपवून ठेवलेल्या 5 अंगठ्या पोलिसांना दिल्या. ही महिला यापूर्वी आणखी कोणत्या दुकानात कामाला होती का, तीने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
अतिरिक्त कार्यभार पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 विवेक पाटील (DCP Vivek Patil),
सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Inspector of Police Shrihari Bhairat),
पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे (Police Inspector Harshvardhan Gade), पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (PSI Rahul Khandale),
शंकर कुंभारे (PSI Shankar Kumbhare),
पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप पाटील, संदीप तळेकर, रवी लोखंडे, विशाल जाधव, राहुल मोरे, हिंमत होळकर,
सागर घाडगे, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, किरण शितोळे, महेश पवार यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Khadak police arrest woman for stealing jewelery from HP jewelers in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गांजा विक्री करताना सराईत गुन्हेगाराला अटक, मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई

 

Pimpri Corona Updates | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी घट, गेल्या 24 तासात 2942 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

LIC Dhan Rekha Policy | चांगल्या रिटर्नसाठी ‘या’ पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, जाणून घ्या काय आहे विशेष