Pune Crime | मोटार विक्रीच्या व्यवहारातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण; मृत म्हणून टाकले माळशेज घाटात

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोटार विक्रीच्या (Motor Sales) व्यवहारातून महाविद्यालयीन युवकाचे (College Youth) अपहरण (Kidnapping) केले. त्यानंतर दोरीने गळा आवळ्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे असे समजून त्याला माळशेज घाटात (Malshej Ghat) टाकून दिल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे.

 

नितीन बाळासाहेब कदम Nitin Balasaheb Kadam (वय २३, रा. वेणेगाव, पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर-Solapur) असे अपहरण झालेल्या युवकांचे नाव असून त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज उर्फ बंडू रामदास मुळे Manoj alias Bandu Ramdas Mule (रा. तराळवस्ती, टेंभुर्णी) याच्यासह अन्य पाचजणांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नितीन हा बारामतीमधील एका महाविद्यालयात शिकत आहे. त्याच्याकडे स्कॉर्पिओ Scorpio (क्र एमएच-42, एक्स-9296) गाडी होती. ती गाडी ऑगस्ट 2020 मध्ये नोटरीद्वारे व्यवहार करत ओळखीच्या मनोज उर्फ बंडू मुळे याला विकली. मात्र व्यवहार ठरल्याप्रमाणे बंडू मुळे याने नितीनला पैसे दिले नाही. त्यामुळे टिटी फॉर्मवर (TT Form) नितीनने सही करण्यास नकार दिला. त्यानंतर नितीनने टेंभुर्णी पोलीस ठाणे (Tembhurni Police Station) व सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना (Solapur SP) त्याच्या विरोधात अर्ज दिला. त्यामुळे मुळे नितीनला धमकावत होता.

नितीन हा 21 मार्चला बारामतीमधील जिममध्ये व्यायाम करत असताना तेथे बंडू मुळे आणि त्याचे साथीदार आले.
त्यांनी तू मुलीची छेड काढली असून भिगवण पोलीस ठाण्यात (Bhigwan Police Station) चल असे सांगत त्याला गाडीत बसवले.
त्याने विरोध केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
गाडी करमाळा रस्त्यावर (Karmala Road) आली असता त्यांनी नितीनचा मोबाईल काढून घेत टिटी फॉर्मवर सह्या करण्यास सांगितले.
नितीनने नकार देतात त्याच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारली. तसेच जबरदस्तीने नितीनचा अंगठा टी. टी. फॉर्मवर घेतला.
त्यानंतर सर्वजण गाडीतून बाहेर आले. एकाने आणलेल्या रस्सीने नितीनला बांधत त्याच्या चेहऱ्यावर टॉवेल टाकला.
आरोपींमध्ये नितीनला मारुन मृतदेह माळशेज घाटात टाकू अशी चर्चा सुरु होती. मुळेने नितीनचा गळा रस्सीने आवळल्याने तो बेशुद्ध पडला.
सर्वांना त्याचा मृत्यू झाला आहे असे वाटल्याने नितीनला माळशेज घाटात टाकण्यात आले.

 

दरम्यान, नितीनला ज्यावेळी जाग आली त्यावेळी आपण कोठे आहे हे त्याला समजत नव्हते.
घाटातून पायी चालत तो वर गेला. तेथे काम सुरु असलेल्या कामगारांकडे त्याने विचारणा केली असता हे ठिकाण आंबे कॉर्नर, माळशेज घाट असल्याचे समजले.
एका ट्रकचालकाची मदत घेत नितीन लगतच्या टोकावडे पोलीस स्टेशनला (Tokawade Police Station) गेला. त्यानंतर कुटुंबियांना या प्रकाराची माहिती दिली.

 

Advt.

Web Title :- Pune Crime | kidnapped a college student and threw him in malshej ghat baramati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | 35 पैशाच्या पेनी स्टाॅकने केलं मालामाल ! 6 महिन्यात 1 लाखांचे 17 कोटी; तुमच्याकडे आहे ‘हा’ शेअर?

 

Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | दीड हजार रुपयांची लाच घेताना कृषी सहाय्यक अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एमईएस इलेव्हन संघांचा पहिला विजय