Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि मॅगझीनमध्ये तीन जिवंत काडतुसे (Cartridge) जप्त केली आहेत. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) खडी मशीन परिसरात (khadi machine chowk) केली.

 

मनोज उर्फ सारस रमेश खाडे Manoj alias Saras Ramesh Khade (वय-29 रा. 144/पी, सत्यवीर मित्र मंडळा जवळ, शिवदर्शन, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार गणेश चिंचकर (Ganesh Chinchkar) व योगेश कुंभार (Yogesh Kumbhar) यांना खडी मशी परिसरात बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील (Bibwewadi Police Station) रेकॉर्डवरील मनोज खाडे हा कात्रज ते उंड्री रोडवर थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन सापडली. मॅगझीन काढून पाहिली असता त्यामध्ये तीन जिवंत काडतुस होते. पोलिसांनी आरोपीकडून पिस्टल आणि काडतुस असा एकूण 50 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil),
पोलीस निरीक्षक गुन्हे गोकुळ राऊत (Police Inspector Gokul Raut)
यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे (API Anil Suravase),
पोलीस अंमलदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, दिपक जडे, अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Kondhwa police arrest criminal carrying unlicensed pistol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेत कामाशिवाय प्रवेशबंदी ! लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्रही अनिवार्य

 

UCO Bank New Debit Card | युको बँकेच्या नवीन कार्डने 2 लाखांपर्यंतची खरेदी करा, मोफत आरोग्य तपासणीचाही लाभ घ्या

 

PM Jan-Dhan Account मध्ये जमा रक्कमेबाबत मोठे अपडेट, जाणून घ्या काय सांगतात Finance ministry चे हे आकडे