Pune Crime | पॅरोलवर सुटलेल्या आरोपीकडून मेफेड्रॉन (MD) ड्रग्ज जप्त, कोंढवा पोलिसांची कारवाई

Pune Crime Allegation of kidnapping and robbing a doctor who was charged with molestation Kondhwa police registered robbery case against four
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर (Parole) बाहेर आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 74 हजार 920 रुपये किंमतीचे मेफेड्रॉन Mephedrone (MD) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी एन.आय.बी.एम कडून उंड्रीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर (Pune Crime ) मंगळवारी (दि.21) केली आहे.

 

शाबीर शमशुद्दीन शेख (वय-45 रा.मिलींद पार्क, कोंढवा खुर्द) आणि शाहरुख समशेर शेख (वय-29 रा. जनवाडी मशीद मागे, शिवाजीनगर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याचे (Kondhwa Police Station) पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी उंड्रीच्या दिशेने जाणाऱ्या वनविभागाच्या जागेच्या समोर दोन व्यक्ती संशयित आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेले 74 हजार 920 रुपये किमतीचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. तसेच 1220 रुपयांची रोख रक्कम मिळाली. पोलिसांनी दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime)

 

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil),
पोलीस निरीक्षक गुन्हे गोकुळ राऊत (Police Inspector Gokul Raut) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील (PSI Swapnil Patil), पोलीस नाईक जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, सतिश चव्हाण लक्ष्मण होळकर, पोलीस शिपाई किशोर वळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले (PSI Samadhan Machale) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Kondhwa police Arrest criminal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Earn Money | 3 महिन्यांत 3 लाख कमावण्याची संधी, जाणून घ्या कोणत्या आयडिया आहेत ज्याद्वारे तुम्ही लगेच बनू शकता करोडपती?

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा ! 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून

BHR Scam | बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित, तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला अटक

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’