Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार (Tadipar) करण्यात आले असताना शहरात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor police) अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे. ही कारवाई कवडीपाट येथे करण्यात आली. (Pune Crime)

 

 

राज रविंद्र पवार Raj Ravindra Pawar (वय-24 रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राज पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याला डिसेंबर 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून (Pune District) दोन वर्षासाठी तडीपार (Tadipar) करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पुणे जिल्ह्यातून (Pune district) तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार हातात कोयता घेऊन कवडीपाट परिसरात दहशत पसवरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. (Pune Crime)

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor),
पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, अमित साळुंके, राजेश दराडे, बाजीराव वीर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Loni Kalbhor police arrest criminal who is Tadipar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Digital Currency vs Cryptocurrency | क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये फरक काय?, जाणून घ्या

 

Digital Currency | कसा करणार ‘डिजिटल रुपया’ने व्यवहार, मोबाईलच असेल आता बँक!

 

Maharashtra Police Uniform | पोलिस उप अधिक्षक ते उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची ट्युनिक गणवेशापासून सुटका, DGP संजय पांडे यांनी काढले आदेश