Pune Crime | ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन केला भलताच ‘प्रकार’; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन राडा घालत धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.2) रात्री अकराच्या सुमारास फुरसुंगी (Fursungi) येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

अक्षय राजेंद्र कांचन Akshay Rajendra Kanchan (वय-24 रा. उरुळी कांचन बाजारपेठ जवळ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी फुरसुंगी येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे ओळखीचे असून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध होते.
मात्र, त्यांच्यामध्ये ब्रेकअप (Breakup) झाले आहे.

 

ब्रेकअप झाले असताना आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करुन आणि फोन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
तसेच लग्नाची मागणी करुन लग्न केले नाहीतर बघून घेण्याची धमकी दिली. फिर्यादी तरुणीने त्याला कोणताही प्रतिसाद न देता समज दिली.
तसेच त्याच्या घरच्यांना आणि मैत्रिणीला याबाबत सांगितले. याचा राग आल्याने तरुणाने फिर्यादी यांच्या घरी जाऊन वडिलांकडे लग्नाची मागणी करुन धमकी (Threat) दिली.
असे फिर्यादीत (Pune Crime) नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | lover do wrong things in girl house of hadapsar police station area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supriya Sule | ‘इंदापुरात मी पाटलांना घाबरतो’ राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंची टोलेबाजी, म्हणाल्या…

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 94 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Petrol Diesel Price | लवकरच 60 रुपये प्रति लीटर इंधनात धावणार तुमची कार! मोदी सरकारची विशेष योजना, जाणून घ्या सविस्तर