Pune : दौंड तालुक्यात हत्येच्या घटनेने खळबळ, डोक्यात वार करून मृतदेह ओढ्यात फेकले

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – एका इसमाच्या डोक्यात वार करून मृतदेह ओढ्याच्या पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील कुसेगाव (ता. दौंड) येथे (crime-man-killed-while-working-on-ashtavinayak-highway-in-daund) घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मात्र मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

उत्तम पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम पवार हे दौंड तालुक्यात नव्याने सुरू असलेल्या अष्टविनायक महामार्गावरील कुसेगाव येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर टँकरने पाणी देण्याचे काम करत होते. मात्र आता अचानक गावातील ओढ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत गावचे पोलीस पाटील गणेश शितोळे यांनी यवत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि दौंडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तपास यवत पोलीस करत आहेत.