Pune Crime |  पुण्यातील धक्कादायक प्रकार! नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार

मंचर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  पतीवर मृत्यूचे सावट असल्याचे सांगून त्यावर उपाय म्हणून व्हिडिओ कॉल (Video Call) करत महिलेला विवस्त्र होण्यास मांत्रिकाने (Mantrik) सांगितले. त्यानंतर त्याचे स्क्रीन शॉट काढून महिलेला ब्लॅकमेल (Blackmail) करुन तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका मांत्रिकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल (Pune Crime) झाल्यानंतर मांत्रिक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

विक्रम नामदेव गायकवाड Vikram Namdev Gaikwad (रा. बुरुडगाव रोड. जि. नगर) असे मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) गुन्हा दाखल झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेसोबत ओळख झाली होती. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत आरोपीने पीडित महिलेला ब्लॅकमेल करत वेळोवेळी बलात्कार केला. आरोपीने तिचा विश्वास संपादन करुन महिला व तिच्या पतीवर मृत्यूचे सावट असल्याचे सांगून उपाय म्हणून व्हिडिओ कॉल करुन विवस्त्र होण्यास सांगितले. (Pune Crime)

आरोपीने महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटोचे (Nude Photos) स्क्रीन शॉट काढून ते महिलेला दाखवून तिला ब्लॅकमेल केले.
तिचे फोटो पतीला दाखवून संसार उध्वस्त करण्याची धमकी देऊन तिची इच्छा नसताना जबरदस्तीने मारहाण करीत बलात्कार केला.
तसेच मी मार्कोस कमांडो (Marcos Commando), एन्काउंटर स्पेशालिस्ट (Encounter Specialist) आहे.
याप्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर भररस्त्यात गोळी (Shoot) घालून ठार मारण्याची धमकी (Threat to Kill) या भोंदू मांत्रिकाने दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार मांत्रिकाच पोलीस शोध घेत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | mantrik rapes woman threatens to spread nude photos viral shocking incident in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार