Pune Crime | आई वडिलांची सेवा करण्यासाठी लग्न केले; पतीच्या बाहेरख्यालीपणामुळे विवाहितेची आत्महत्या

पुणे : Pune Crime | आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी व घरातील कामे करण्यासाठी तुझ्याबरोबर लग्न (Marriage) केले असल्याचे सांगून दुसर्‍या तरुणीबरोबर राहून मानसिक व शारीरीक छळ झाल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. (Pune Crime)

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police) सत्यनारायण घनश्यामदास वैष्णव Satyanarayana Ghanshyamdas Vaishnav (वय २५, रा. शहाद्र, छोटा बाजार, जुन्नी दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अरुणा सत्यनारायण वैष्णव Aruna Satyanarayana Vaishnav (वय २६, रा. खराडी) असे आत्महत्या (Suicide In Pune) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हा प्रकार १० जून ते १३ सप्टेंबर २०२२ दरम्यान खराडी (Kharadi) येथे घडला. (Pune Crime)

याप्रकरणी सुगनादेवी गोपालदास रांका Suganadevi Gopaldas Ranka (वय ४६, रा. चौधरी वस्ती, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३२/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण व अरुणा यांचा विवाह झाला होता. सत्यनारायण याचे बाहेर दुसर्‍या मुलीबरोबर संबंध (Love Affair) होते. त्याविषयी अरुणा हिने विचारणा केली. तेव्हा सत्यनारायण याने तुझ्याबरोबर घरातील कामे करण्यासाठी व सासु सासरे यांचा सांभाळ करण्यासाठी लग्न केले असल्याचे सांगून हाताने मारहाण (Beating) केली. तिला जेवण न देता, एकत्र न झोपता तिला बाल्कनीमध्ये झोपण्यास लावत.
त्यामुळे अरुणा माहेरी आली. तेव्हा त्याने मी तुला घेऊन जाण्यासाठी येणार नाही.
तू तुझ्या वडिलांसोबत माझ्या आई वडिलांच्या घरी जा व त्यांची सेवा कर.
मी तुझ्यासोबत राहणार नाही, असे म्हणून तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेऊन तिला मानसिक त्रास दिला.
या त्रासाला कंटाळून अरुणा हिने मंगळवारी सकाळी राहत्या घरासमोर असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे (Assistant Police Inspector Sonwane) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Married to serve parents; Suicide of a married woman due to her husband’s extravagance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC-PMRDA | पीएमआरडीएनेच नाले, ओढ्यांवर बांधकाम परवानग्या दिल्याने; समाविष्ट गावांमध्ये ‘पूरस्थिती’ची परिस्थिती ! ; महापालिकेच्या पत्रानंतरही पीएमआरडीए कडून दोन वर्षात कुठलिच कारवाई नाही

Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 3 पोलिस निरीक्षकांसह 4 PSI च्या अंतर्गत बदल्या

Ajit Pawar | महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे वळवून राज्याला आर्थिक मागास करण्याचा डाव- अजित पवार