Pune Crime | व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणात गज्या मारणे, रूपेश मारणे, पप्पु उर्फ सचिन घोलपसह 14 जणांवर मोक्का कारवाई

Pune Crime | MCOCA action against 14 people including Gajanan Marne, Rupesh Marne,Pappu Sachin Gholap in the case of businessman's kidnapping
File Photo

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कठोर कारवाई

 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Pune Crime | शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) MCOCA ची कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय 43, रा. धनकवडी), हेमंतऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय 39,रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय 46, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय 50, रा. समर्थनगर, कोडोवली, जि.सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा. नर्हे), नितीन पगारे (रा.सातारा), प्रसाद खंडागळे (रा.तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.यात चौघांना अटक करण्यात आली आहे. हा घटनेनंतर गज्या मारणे व इतर फरार झाले आहे.

 

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या तपासात या टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण व्हावे व इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा याकरीता हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

त्यानुसार तसा प्रस्ताव पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना पाठविण्यात आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

गज्या मारणे याने ताळाेजा तुरुंगातून सुटल्यावर मुंबई-पुणे महामार्गावर रॅली काढली होती. त्यावरुभन त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरानंतर त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यातून सुटून आल्यावर तो शांत होता. मात्र, आता सुपारी घेऊन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),

गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Unit 5 Police Inspector Hemant Patil),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne), शैलजा जानकर (API Shailaja Jankar),
पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav), श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
अविनाश लाहोटे (PSI Avinash Lahote), पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे,
राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, प्रमोद टिळेकर, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव,
सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले,
अकबर शेख पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर,
रुपाली कर्णवर यांच्या पथकाने काही आरोपींना अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | MCOCA action against 14 people including Gajanan Marne,
Rupesh Marne,Pappu Sachin Gholap in the case of businessman’s kidnapping

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts