Pune Crime | काय सांगता ! होय, पुणे मनपाचा कर्मचारी निघाला अट्टल मोबाईल चोर, 2 लांखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागात (Health Department) कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने पुणे शहरातील (Pune Crime) विविध भागात मोबाईल चोरी (Mobile theft) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi police) अटक केलेल्या अट्टल मोबाईल चोराकडून 1 लाख 88 हजार रुपये किंमतीचे 21 मोबाईल जप्त केले आहेत. तानाजी शहाजी रणदिवे Tanaji Shahaji Ranadive (वय-33 रा. शांतीनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये (Pune City) मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे.
त्या अनुषंगाने मोबाईल चोरांना पकडण्यासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील (Bibwewadi police station) तपास पथक हद्दीत गस्त घालत होते.
याच दरम्यान पोलीस अंमलदार सतिश मोरे (Satish More) यांना महावीर गार्डनच्या (Mahavir Garden) जवळ मुख्य रस्त्यावर गंगाराम रोड येथे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी तानाजी हा रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोबाईल विकत घेण्याबाबत विचारणा करत असल्याचे दिसून आले.
यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली.
त्यावेळी त्याच्याजवळ 6 मोबाईल सापडले. यासंदर्भात विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

 

50 पेक्षा अधिक मोबाईलची चोरी

पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली.
त्यावेळी त्याने स्वत: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचे सांगितले.
कर्ज फेडण्यासाठी बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरातून जवळपास 50 पेक्षा अधिक मोबाईलची
चोरी केल्याची कबुली दिली.
तसेच चोरीचे काही मोबाईल ओळखीच्या लोकांना विकल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Inspector of Police Sunil Jhaware),
पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Inspector of Police Anita Hivarkar) यांच्या
सुचनेप्रामाणे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसकांवकर (APIRajesh Uskavakar),
पोलीस अंमलदार सतिश मोरे, तानाजी सागर, राहुल शेलार, यांनी ही कारवाई केली.

 

Web Title : Pune Crime | mobile thief working in health department of pune corporation bibvewadi police arrest him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bhausaheb Rangari Ganpati | प्रसिध्द उद्योगपती पुनीत बालन यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमांची केली घोषणा, यंदाही ऑनलाईन कार्यक्रम पाहता येणार

Railway Recruitment 2021 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! विविध पदांसाठी होणार भरती, परीक्षेविना थेट नियुक्ती

Mumbai Rape Case | बलात्कार करुन तरुणीच्या गुप्तांगात टाकला रॉड, मुंबईतील संतापजनक घटना