Pune Crime | वानवडी परिसरात दहशत पसरविणार्‍या सराईत गुन्हेगारावर स्थानबध्दतेची (MPDA) कारवाई; आतापर्यंत 84 गुन्हेगार स्थानबद्ध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल असलेल्या २० वर्षाच्या अट्टल गुन्हेगाराला (Criminals On Pune Police Record) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी एक वर्षासाठी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. (Pune Crime)

 

अजय विजय उकिरडे Ajay Vijay Ukirde (वय २०, रा. लक्ष्मीमाता मंदिरामागे, रामटेकडी, हडपसर – Ramtekdi Hadapsar) असे या गुंडाचे नाव आहे. (Pune Crime)

 

अजय उकिरडे याने साथीदारांसह वानवडी (Wanwadi) भागात लोखंडी कोयता, रॉड, पालघन, लाकडी बांबु या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder), जबरी चोरी (Robbery), गंभीर दुखापत करणे, गृह आगळीक, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहे. मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड (Senior Police Inspector Deepak Lagad) व पी सी बी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांच्याकडे पाठविला होता. गुप्ता यांनी उकिरडे याला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत ८४ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | MPDA action against criminals spreading terror in Wanwadi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा