Pune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोणी काळभोरमधील छत्रपती शिवाजी उद्यान येथील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा गळा दाबून खुन (Murder) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे.

विजय ऊर्फ गुलशन रोहिदास मोरे (वय २३, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रोहित मोरे यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी सांगितले की, विजय मोरे हा खोदकामाचे मिळेल तेथे मजुरी काम करत होता. त्याला दोन वर्षांपासून दारु पिण्याचे व्यसन होते. विजय हा आईसह रहात होता. त्याच्या शेजारी त्याचा भाऊ व पत्नी, मुलगी रहातात.

विजय रविवारी रात्री साडेदहा वाजता अर्ध्या तासात जाऊन येतो, असे आईला सांगून घराबाहेर गेला होता. तो रात्री परत आला नाही. त्यामुळे त्याची आई कांताबाई मोरे यांनी सकाळी रोहित याला सांगितले.

यादरम्यान, रोहित हा त्याला शोधायला बाहेर गेला तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा विनोद जाधव याने
पाण्याच्या टाकीजवळ विजय बेशुद्धावस्थेत पडला असून त्याच्या चेहऱ्यावर रक्त आलेले आहे असे सांगितले.

लोणी काळभोर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी मृत्यु झाल्याचे सांगितले.
शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लोणी काळभोर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- Pune Crime | Murder of youth in loni kalbhor area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MP Supriya Sule | किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का? खा. सुप्रिया सुळेंचा सवाल

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले – ‘…त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव’

Pune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा