Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंढवा परिसरात राहणार्‍या 16 वर्षीय मुलीला वेळावेळी ब्लॅकमेल (Blackmail) करून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी 20 वर्षीय युवकाला अटक केली आहे. त्याच्याविरूध्द भादंवि 376, पोक्सो 4,8, 12 अन्वये मुंढवा पोलस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुरनं 108/2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

युवराज चौगुले Yuvraj Chougule (20, रा. सर्व्हे नं. 69, सॅफरॉन हॉटेलच्या मागे, बि.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी युवराज चौगुले हा फिर्यादीच्या परिसरात रहावयास आहे. त्याने पिडीत मुलीला वारंवार त्रास दिला आणि त्यानंतर मैत्रिपुर्ण संबंध प्रस्थापित केले. मैत्रिबाबत आई-वडिलांना सांगेल, तुझा काटा काढेल अशी धमकी देवुन युवराज चौगुलेने पिडीत मुलीचा लैंगिक छळ केला आणि तिच्यावर अत्याचार केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी युवराज चौगुलेला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिनवडे करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | 16-year-old girl raped by blackmail in Mundhwa, 20-year-old youth arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘…त्यांना कोर्टाची कारवाई समजत नाही’, विरोधकांच्या ‘त्या’ टिकेवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)

Ajit Pawar | ‘न्यायालयाने नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?’, अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल