Pune Crime News | नोकरीच्या अमिषाने कर्वेनगर येथील तरुणीची 4 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पार्ट टाईम नोकरी (Part Time Job) देण्याचे आमिष दाखवून टास्क पूर्ण करण्यास सांगितला. त्यानंतर ठराविक रक्कम देऊन एका तरुणीची 4 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. हा प्रकार सप्टेंबर 2023 मध्ये कर्वेनगर येथे राहणाऱ्या तरुणीच्या घरी ऑनलाईन घडला आहे. याबाबत पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) सायबर चोरट्यांविरुद्ध (Cyber Crime) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत वर्षा ठाकूर (वय-37 रा. कर्वेनगर, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम आयडी धारक व व्हॉट्सअप क्रमांक 84974XXXXX यांच्यावर आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना रोशनी मुखर्जी व सुधांशु दास या टेलिग्राम युजर आयडी धारकांनी संपर्क साधला. त्यांना पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन टास्क पूर्ण केला तर चांगले पैसे मिळतील असे सांगितले. सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना ऑनलाईन टास्क दिला. त्यानुसार फिर्यादी यांनी टास्क पूर्ण केला. टास्क पूर्ण केल्यानंतर काही रक्कम मिळाली. त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. (Pune Crime News)

यानंतर आरोपींनी प्रिपेड टास्क पूर्ण केला तर जास्तीचा परतावा मिळेल असे सांगितले.
त्यासाठी फिर्यादी यांना पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार वर्षा ठाकूर यांनी 4 लाख 8 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केली.
पैसे गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना टास्क दिला नाही. तसेच कोणताही परतावा दिला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वर्षा ठाकूर यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात वर्ग केला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विजेचे बिल थकल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, पुण्यातील एरंडवणे परिसरातील घटना