… म्हणून ‘त्याने’ पोलीसांसमोरच घेतले पेटवून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध दारू धंद्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून पोलिसांनाच खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देत एकाने दारू अंगावर ओतून पेटवून घेतले. घटनेत सुनील रामदास काळे (वय २८) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची माहिती अशी, पोलीस हवालदार थिकोळे हे निंब ओंढा (तळेगाव ते न्हावरा रोड) येथे अवैध हातभट्टी दारूव्यवसायावर छापा घालण्यासाठी दोन पंचांसमवेत गेले होते. यावेळी सुनील काळे हा पत्राशेडमध्ये १० लिटर गावठी हातभट्टीची दारू व दारूने भरलेल्या प्लॅस्टिक पिशवीच्या फुग्यांसह आढळला. त्याचा पंचनामा करून कारवाईही करण्यात आली.

दरम्यान, परत येताना सुनील काळे व जुन्या बापू काळे हे आपापसांत भांडत असल्याने थिकोळे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, सुनील काळे याने तुम्हा सगळ्यांनाच खोट्या गुन्ह्यात फसवितो, असे म्हणत खिशातून दारूची पिशवी काढून अंगावर ओतून पेटवून घेतले. त्यात तो भाजला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव

Loading...
You might also like