Pune Crime News | ‘हा आमचा इलाका’ म्हणत तृतियपंथीयांकडून हप्ता घेणाऱ्या 5 जणांना अटक, तळेगाव येथील प्रकार

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ‘इथे उभे राहायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यायचा, हा आमचा इलाका आहे’ असे म्हणत तृतियपंथीयांकडून (Transgender) हप्ता वसूल करणाऱ्या पाच जणांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. हा प्रकार जानेवेरी 2023 ते रविवारी (दि.5) रात्री आठच्या दरम्यान सी.आर.पी.एफ. कॅम्प समोरील तळ्याजवळच्या रोडच्या कडेला घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत नंदकिशोर उर्फ नंदिनी ज्ञानेश्वर पेढेकर (वय 30 रा.वाल्हेकरवडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्रकाश उर्फ बाळा प्रमोद शेंडे (वय 27 रा. खंडोबा मळा, तळेगाव दाभाडे), अमित मुरलीधर पवार (वय 28 रा. मारुती मंदीर चौक, पवार चाळ, तळेगाव दाभाडे), अजय महादेव भंडलकर (वय 23 रा. रणजितसिंह कॉलनी, तळेगाव दाभाडे), आकाश विजय कुडालकर (वय 20 रा. निळकंठनगर, तळेगाव दाभाडे), निशान बसंतराज गायकवाड (वय 28 रा. संभाजीनगर, तळेगाव दाभाडे) यांच्यावर आयपीसी 384, 386, 388, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या तृतियपंथी असून त्यांच्या सोबत इतर चार मैत्रीणी तळेगाव दाभाडे
जवळील कॅम्प रोड परिसरात पैसे मागण्याचे काम करतात. जानेवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात फिर्यादी व त्यांची
मैत्रीण पुजा रोडच्या कडेला थांबले होते. त्यावेळी आरोपी बाळा शेडे व अमित पवार हे दोघे दुचाकीवरुन आले.
त्यावेळी शेडे याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच या ठिकाणी उभे रायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल असे
म्हणत हप्त्याची मागणी केली. (Pune Crime News)

आरोपींनी हप्त्याचे पैसे वाढवून मागत फिर्यादी व त्यांच्या मैत्रीण यांना वारंवार धमकी देऊन पैशांची मागणी केली.
फिर्यादी यांनी घाबरून आरोपींना जानेवारी 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अंदाजे 1 लाख 12 हजार 500
रुपये हप्ता रोख व ऑनलाईन दिला. त्यांच्या रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादी यांनी
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुनी 500 ची नोट मागण्याच्या बहाण्याने रोकड लंपास, स्वारगेट परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना डिवचले, म्हणाले – ’40 वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण…’

MLA Ravindra Dhangekar | ललित पाटील ड्रग्स केस : …तर पोलीस आयुक्तांच्या घराबाहेर आंदोलन करणार, आमदार रविंद्र धंगेकरांचा इशारा

Pune PMP News | पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ९ हजार ४५१ सेवकांना बोनस

Chhatrapati Sambhajinagar Accident News | दिवाळी गिफ्ट अन् मिठाई घरी घेऊन जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; छ. संभाजीनगर येथील घटना