Chhatrapati Sambhajinagar Accident News | दिवाळी गिफ्ट अन् मिठाई घरी घेऊन जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; छ. संभाजीनगर येथील घटना

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Chhatrapati Sambhajinagar Accident News | कर्तव्य बजावून पोलीस निरीक्षकांनी दिलेली दिवाळीची मिठाई आणि भेटवस्तू घरी घेऊन जात असताना पोलीस कर्मचाऱ्याचा भीषण अपघात झाला. दुचाकी समोर भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने अचानक ब्रेक लावल्याने पोलीस शिपायाची दुचाकी टेम्पोवर जाऊन जोरात आदळली. यामध्ये गंभीर जखमी होऊन पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.8) रात्री अकराच्या सुमारास गोलवाडी फाट्याजवळ घडली. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Accident News)

स्वप्निल महेंद्र अवचरमल Swapnil Mahendra Avcharmal (वय-25 रा. हनुमान टेकडी, बेगमपुरा) असे मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात (MIDC Walaj Police Station) पोलीस शिपाई म्हणून कार्य़रत होते. त्यांचे वडील महेंद्र अवचरमल यांचे अकाली निधन झाल्याने स्वप्नील हे अनुकंपातत्त्वावर 5 मे 2019 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. (Chhatrapati Sambhajinagar Accident News)

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ते चालक म्हणून कर्तव्य निभावत होते. बुधवारी रात्री कर्तव बाजावून दिवाळीची मिठाई आणि गिफ्ट घेऊन ते घराकडे जात होते. गोलवाडी फाट्याजवळ आल्यानंतर एमएच 20 एसटी 4832 क्रमांकाच्या टेम्पोने वळणावर अचानक ब्रेक लावला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या स्वप्नील यांची दुचाकी टेम्पोवर धडकली. यामध्ये स्वप्निल दुचाकीवरुन दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहायक पोलीस उपनिरीक्षक यांनी स्वप्नील यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील यांच्या पश्चात आई, सहावीत शिकणारा लहान भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, बुधवारी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव (PI Avinash Aghav) यांनी पोलीस ठाण्यातील सर्व
कर्मचाऱ्यांना मिठाई व भेटवस्तू दिल्या होत्या. हीच भेटवस्तू व मिठाई घरी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यूने
स्वप्नील यांना गाठले. या घटनेमुळे अवचरमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Firing News | धक्कादायक! पुण्यात सराफा व्यवसायिकावर गोळीबार करुन दागिन्यांची बॅग पळवली, हल्लेखोरांनी झाडल्या 6 गोळ्या

Pune Crime News | ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील तरुणीची फसवणूक

Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार

NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज दुपारी सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न, पुणे धर्मादाय आयुक्त कार्य़ालयातील 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल