महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न, RPF पोलिसांमुळे टळली दुर्घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मित्रासोबत निर्जन स्थळी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला 8 जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा बल) कर्मचाऱ्यामुळे ही घटना टळली आहे. पोलिसांना पाहून टोळके पसार झाले. आळंदी (देवाची) रेल्वे स्टेशन परिसरात घडली हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळंदी रेल्वे स्टेशन जवळ आरपीएफचे पोलीस निरीक्षक कासार व त्यांच्या पथकातील बी.जी.कोंडे, हवालदार एन.आर.कुंभार हे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता गस्त घालत होते. त्यावेळी क्रमांक 24 येथे एक दुचाकी दिसून आली. दुचाकी महिलेची असल्याचा संशय आल्याने ते पथकाने पाहणी केली. त्याचवेळी शेतातून आवाज आला. यामुळे पथक नाईट टॉर्च घेऊन शेतात शिरले. आत गेल्यानंतर त्यांना पाहुन अज्ञात सात ते आठ व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेले. पोलीस पुढे चालत गेले असता, त्यांना घाबरलेल्या अवस्थेत एक मुलगी मिळुन आली.

पोलीसांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने स्वत:चे नाव सांगत एका महाविद्यालयातील ‘जर्नालिझम’च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेते असे सांगितले. तीन मित्रांसोबत संबंधित ठिकाणी आल्याचे तिने सांगितले. मित्रांचे कार मध्ये बसले असता अचानक त्याठिकाणी सात ते आठ अनोळखी व्यक्तींचे टोळके आले व त्यांनी हातात तलवार, लोखंडी रॉड घेऊन कोणतेही कारण नसताना थेट मारामारी करण्यास सुरुवात केली. बेदम मारहाण होऊ लागल्याने संबंधित मित्र त्या ठिकाणावरुन तिला एकटी सोडून जिवाचे भितीने पळून गेल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com