पुण्यात पायी जाणार्‍या डॉक्टर तरूणीच्या हातातील मोबाईल हिसकावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पादचारी डॉक्टर तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना बंडगार्डन परिसरात घडली. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे.

याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात 26 वर्षीय डॉक्टर तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास काम संपवून बंडगार्डन येथील कोणार्क सोसायटी समोरून पायी फोनवर त्यांच्या आईशी बोलत जात होत्या. त्यावेळी अचानक एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आली. त्या व्यक्तीने तरुणीच्या हातामधील वीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल आचानक जबरदस्तीने हिसकावून नेला. त्यांनी त्या चोरट्याचा काही अंतरापर्यंत अंधारातही पाठलाग केला. पण, पुढे कोपऱ्यावर दुसरा साथीदार हा पांढऱ्या रंगाची स्कूटर घेऊन उभा होता. त्या स्कूटरवरून दोघेही पसार झाले. त्यानंतर डॉक्टर तरुणीने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा माग काढला जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षर सी. एस चौधरी हे करत आहेत.