Pune : पुन्हा खरेदीच्या बहाण्याने गल्ल्यातील ३० हजारांची रोकड पळवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात खरेदीच्या बहाण्याने दुकानात येऊन गल्यातील रोकड पळविणाऱ्या टोळ्यांनी चांगलाच धुडगूस घातला असून, पुन्हा धानोरीत एका हार्डवेअरच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरुन गल्यातील 30 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली आहे.

याप्रकरणी रामचंद्र गायकवाड (वय ६०, रा. हरिकृष्ण पार्वâ, धानोरी ) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरीतील साई कॉर्नर इमारतीत रामचंद्र यांचे हार्डवेअर मेटेरियल विक्रीचे दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी दुपारी अडीचच्या सुमारास दोघेजण खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले. त्यावेळी एकाने रामचंद्र यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर दुसNया चोरट्याने त्यांच्या गल्ल्यातील ३० हजारांची रोकड चोरुन नेली. दोघेही चोरटे निघून गेल्यानंतर रामचंद्र यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते अधिक तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like