Pune Crime News | आरटीओमध्ये टॅक्स न भरता 8 लाखांची फसवणूक, बाणेर परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चॉईस नंबर व टॅक्स डिफरन्सचे (Tax Difference) 8 लाख रुपये घेतले. मात्र, ते पैसे आरटीओमध्ये (Pune RTO) जमा न करता फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते जून 2021 दरम्यान बाणेर येथील साई दत्त रेसीडेन्सी येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत प्रशांत विनायक कातखेडे (वय-47 रा. बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. तर विशाल अर्जुन सोनवणे (Vishal Arjun Sonwane) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कातखेडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल सोनवणे याने फिर्यादी प्रशांत कातखेडे यांचा विश्वास संपादन केला. आरटीओ कार्यालयात गाडी नोंदणी करण्यासाठी व चॉईस नंबर घेण्यासाठी तसेच टॅक्स डिफरन्स भरण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. आरोपीने मागणी केल्याप्रमाणे फिर्य़ादी यांनी 7 लाख 82 हजार 653 रुपये आरोपीला दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपी ते पैसे आरटीओ कार्यालयात न भरता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी विशाल सोनवणे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Female Police Officer Suspended In Pune | पुण्यातील महिला पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Ajit Pawar | बारामतीमध्ये अजित पवारांना गावबंदी? मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! पोलीस आणि संबंधिताना दिले निवेदन

Maratha Reservation | नांदेडमध्ये खासदार प्रताप पाटलांच्या गाड्यांची तोडफोड, गावबंदी असतानाही ताफा गावात आला

Petrol-Diesel Price | शेअर मार्केटमध्ये घसरण, पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार? आजचे दर जाणून घ्या