Pune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलगी अन वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून, सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार एनआयबीएम रोड परिसरात घडला आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी ३७ वर्षीय सावत्र बापाला अटक केली आहे. याबाबत १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील पिडीत अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप आहे. मार्केटयार्ड भागात कामाला आहे. तो अधून-मधून घरी येत होता. बुधवारी (दि.१६) तो पिडीत मुलीच्या घरी आला होता. ती घरात झोपली असता सावत्र पित्याने तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे पिडीत मुलीला जाग आली. त्यावेळी त्याने तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रसंगावधान राखत सावत्र पित्यास लाथ मारून बाजूला केल्यानंतर तो पळून गेला. झालेल्या प्रकरामुळे पिडीत मुलगी खुप घाबरली होती. दोन दिवसानंतर आपल्या सोबत झालेल्या प्रकाराची माहिती तिने आईला सांगितली. अधिक तपास महिला उपनिरीक्षक गिरी करत आहेत.