Pune Crime News | मुंढव्यात 27 वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपर तरूणीचा विनयभंग, तरूणाने नग्न अवस्थेत केलं घृणास्पद कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंढव्यातील केशवनगर (Keshav Nagar Mundhwa) परिसरात मैत्रिणींसोबत राहणार्‍या एका 27 वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपर तरूणीचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Pune Police) एका तरूणाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने लग्न अवस्थेत तरूणीशी लगट करण्याचा प्रयत्न केला आहे. (Pune Crime News)

 

अजिंक्य रमेश सावंत Ajinkya Ramesh Sawant (26, रा. डी. 32, मेघवाडी, डॉ. एस एस राव रोड, लालबाग, लोअर परळ, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरूणीने फिर्यादी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तरूणी ही येरवडा (Yerwada) परिसरातील एका कंपनीत सिनीअर सॉफ्टवेअर डेव्हलपर (Senior Software Developer) म्हणून काम करते. ती तिच्या इतर मैत्रिणींसोबत मुंढव्यातील केशवनगर परिसरात 3 बीएचके फ्लॅटमध्ये रहावयास आहे. दि. 7 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिडीत तरूणीच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेन्ड अजिंक्य रमेश सावंत हा मुंबईवरून त्यांच्या फ्लॅटवर आला. पिडीत तरूणीच्या मैत्रिणीने अजिंक्य आणि पिडीत तरूणीची ओळख करून दिली. त्यानंतर ते सर्वजण बाल्कनीमध्ये गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी अजिंक्य हा दारू पित होता. दि. 8 एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पिडीत तरूणी तिच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली. (Pune Crime News)

सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पिडीत तरूणीला तिच्या अंगावरून कोणीतरी हात फिरवत असल्याची जाणीव झाली. तिला जाग आणि त्यावेळी तिच्या समोर अजिंक्य हा पुर्ण नग्न अवस्थेत (Naked) उभा होता. त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. खांद्याला व हाताला पकडून तो पिडीत तरूणीच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करीत होता. पिडीत तरूणी तात्काळ तिच्या रूमबाहेर पडली. त्यानंतर तिने मित्राला कॉल केला आणि नंतर पोलिसांना घटनेबाबत सांगितले. (Crime Against Woman)

 

मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे (Sr PI Ajit Lakde),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade),
पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर (PSI Pramod Kolekar) यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपी अजिंक्य सावंत याच्याविरूध्द मुंढवा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी काटे (PSI Shivaji Kate) करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | A 27-year-old senior software developer Molestation Case in Mundhwa,
Ajinkya Ramesh Sawant did a disgusting act while naked

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा