Pune Crime News | मायलेकींना मारहाण अन् विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा, लोहगाव परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दहीहंडीचा (Dahi Handi) कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केला. याचा जाब विचारला असता दोघांनी मायलेकींना बेदम मारहाण केली. हा प्रकार 7 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास लोहगाव रोड (Lohegaon Raod) येथील दगडी चौकात घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-47) बुधवारी (दि.13) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय पवार व आकाश पवार (दोघे रा. बर्माशेल, विमाननगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मुलगी 7 सप्टेंबर रोजी दगडी चौकात दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी मुलीसोबत गैरवर्तन करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारला असता आरोपी विजय पवार व आकाश पवार या दोघांनी मायलेकींना हाताने बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन

खडकी परिसरात दहशत माजवणाऱ्या शाहरुख उर्फ सुलतान बागवान टोळीवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 61 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA