Pune Jalgaon Crime News | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण खंडणी व फसवणूक प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा जबाब; खटल्यात मदत करण्यासाठी त्यांच्याकडूनही खंडणी…

साक्षीदार एसआयटी समोर

 

पुणे / जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Jalgaon Crime News | खंडणी (Ransom) व फसवणुक (Cheating Case) प्रकरणात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Advocate Pravin Chavan) याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे. या एसआयटी समोर शनिवारी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाचा जबाब नोंदविला आहे. या बांधकाम व्यावसायिकालाही खटल्यात मदत करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर खंडणी मागितली. तसेच त्यांच्या व्यवसायात नातेवाईकाला भागीदार करुन घेण्यास भाग पाडल्याचे या बांधकाम व्यावसायिकाने आपल्या जबाबात सांगितले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. (Pune Jalgaon Crime News)

 

जळगाव येथील बीएचआर मल्टी स्टेट पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने त्यावर अवसायक जितेंद्र कंडारे (Jitendra Kandare) याची नेमणूक करण्यात आली होती. त्याने इतरांच्या सहाय्याने ठेवीदारांच्या पावत्या अल्प किंमतीला घेऊन १०० टक्के पैसे परत केल्याचे भासवून लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक (Fraud) केली होती. प्रकरणात मदत करण्याचे आमिष दाखवून विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याने १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत सुरज सुनिल झंवर यांनी तक्रार दिली होती. गुन्हयाचा तपास नंतर जळगावला हस्तांतरीत करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सध्या एसआयटी करीत आहेत.

 

याप्रकरणी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाचा जबाब नोंदविण्यात आला. जवळपास ३ तास हा जबाब नोंदविला जात होता. यावेळी या बांधकाम व्यावसायिकाने जबाबात सांगितले की, प्रविण चव्हाण याने आपल्याला पुण्यातील एका मोठ्या खटल्यात मदत करण्याचे आमिष दाखवून कशी खंडणी मागितली. नातेवाईकाला व्यवसायात भागीदार करण्यासाठी कसा दबाव टाकला, याची माहिती जबाबात दिली असल्याचे सांगण्यात येते. (Pune Jalgaon Crime News)

याबरोबरच तेजस मोरे (Tejas More) यांचाही जबाब नोंदविण्यात आला.
विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण याच्या कार्यालयात नेहमी जाणे येणे होते. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्या कार्यालयात गेलो,
तेव्हा प्रविण चव्हाण त्यांचे सहकारी अ‍ॅड. मोहित माहिमतुरा (Adv. Mohit Mahimtura) हे पैसे मोजत होते.
तेव्हा विचारणा केल्यावर चव्हाण याने एक कोटी आपलेच अशा शब्दात उत्तर दिले होते.
ही रोकड उदयने पाठविली असल्याचे सांगितले.
त्यातील एक लाख रुपयांची रोकड अ‍ॅड. मोहित माहिमतुरा यांना दिली गेल्याचे मोरे यांनी जबाबात सांगितले.

 

Web Title :- Pune Jalgaon Crime News | Statement of Pune builder in
Adv. Pravin Chavan extortion and fraud case; Extortion from them to help in the case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा