Pune Crime News | अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍या पीटी शिक्षकाला अटक

णे : पोलीसनामा ऑनलाईन –  Pune Crime News | शाळेच्या पीटीच्या तासाला अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation) करणार्‍या शिक्षकाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

अजय सोनवणे (Ajay Sonwane) असे या पीटी शिक्षकाचे (PT Teacher) नाव आहे.

 

याप्रकरणी एका पालकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०८/२३) दिली आहे. मांजरी खुर्द येथील शाळेच्या मैदानावर ३ फेब्रुवारी रोजी सकाळी पीटीचा तास सुरु होता. यावेळी अजय सोनवणे या शिक्षकाने १२ वर्षाच्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून तू मला खूप आवडते, तुला मी आवडतो का असे म्हणून तिचा विनयभंग केला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | PT teacher arrested for molesting minor girls

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा