Deepak Kesarkar | पुण्यातील पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी दीपक केसरकरांची राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना साद; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Deepak Kesarkar | पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन जागांवर पोटनिवडणुक (Pune Bypolls) जाहीर झाली आहे. पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) प्रयत्न सुरू आहेत. विविध राजकीय पक्षांच्या भेटीगाठी तसेच फोनवरून संवाद साधण्याचा सिलसिला सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी देखील या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे आवाहन केले आहे. त्यातच आता या पोटनिवडणुकांवर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केले आहे. तसेच त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आवाहन केले आहे.

 

आज (दि.०५) माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. पूर्वी ती खंडित झाली होती. तेव्हा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी स्वत: पुढाकार घेऊन ती परंपरा पुन्हा सुरू केली होती. शरद पवार हे सर्वांचेच नेते आहेत. त्यामुळे यावेळीही ते ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतील, अशी मला खात्री आहे.’ असा विश्वास यावेळी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

तर, नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निकालावर भाष्य करताना ते (Deepak Kesarkar) म्हणाले, ‘विधानपरिषदेच्या निकालामुळे (MLC Election Results) हुरळून जाण्याची गरज नाही. कारण या निकालाचा अभ्यास मी स्वत: केला आहे. अमरावतीला आम्हाला धक्का बसला. तेथे साडेचार हजार मते बाद झाली. मराठवाड्यात आमच्या शिक्षण संस्था नाहीत. त्यामुळे औरंगाबादची जागा अनेक वर्षे राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसकडे (Congress) राहिलेली आहे. कोकणच्या जनतेने बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेल्या लोकांना धडा शिकवला. त्यामुळेच या जागेवर आमचा उमेदवार एकतर्फी निवडून आला. कोकणात शिवसेनेचे मूळ आहे.’ असे यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले.

 

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघात या
दोन्ही पक्षांकडून आज (दि.०५) उमेदवार घोषीत केले जाऊ शकतात.
पण त्याअगोदर सत्ताधारी भाजप शिंदे गट विरोधकांचे मन वळविण्यात यशस्वी होणार का?
हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar urges sharad pawar mediation for chinchwad kasba peth by election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा