Pune Crime News | महिलेचा पाठलाग करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी, विनयभंग करणाऱ्या पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेचा पाठलाग करत, हात पकडून तिचा विनयभंग (Molestation Case) केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हडपसर परिसरातील महादेवनगर येथील एका शाळेजवळ व महिलेच्या घराजवळ घडला आहे. आरोपी मागील एक वर्षापासून महिलेचा पाठलाग करुन तिला मानसिक त्रास देत होता. (Pune Crime News)

याबाबत महादेवनगर येथे राहणाऱ्या 31 वर्षाच्या महिलेने बुधवारी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर बाळासाहेब मचाले (वय-27 पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा तोंडओळखीचा आहे.
आरोपीने फिर्यादी यांचा नोव्हेंबर 2022 पासून वारंवार पाठलाग करत होता. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन त्यांच्यासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. फिर्यादी हे मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असता आरोपी सागर हा त्यांचा पाठलाग करत होता. मंगळवारी आरोपी फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीच्या खाली थांबला होता. महिला मुलांना शाळेत सोडून घरी जात असताना त्याने हात पकडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांधले (PSI Gandhle) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | इंदापूरात मराठा आंदोलकांच्या जलसमाधीने प्रशासनाची धावपळ, एक आंदोलक बुडाला पण सुदैवाने बचावला!

Pune Crime News | पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खून, येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरातील घटना

Priyanka Chopra Glamorous Look | ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियाचा वाढवला पारा…!

Malaika Arora Bold Look | मलाइका अरोरानं घातला काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली उर्फी सोबत तुलना..