Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | धक्का दिल्याच्या कारणावरून एकाने वकिलास शिवीगाळ करून लाकडी बांबुने मारहाण करून जखमी केल्याची घटना शुक्रवार पेठेत (Shukrawar Peth Pune) घडली आहे. याप्रकरणी वकिलाने खडक पोलिस स्टेशनमध्ये (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

अमोल शिवाजी शेळके Amol Shivaji Shelke (44, रा. निखील अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, पुणे) याच्याविरूध्द पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीचे ऑफिस हे शुक्रवार पेठेतील निखील अपार्टमेंटमध्ये आहे. यापुर्वी देखील गाडी पार्किंगच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी वकिलामध्ये भांडणे झालेली आहेत. (Pune Crime News)

दि. 10 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वकिल हे त्यांची दुचाकी पार्क करीत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागुन आलेल्या अमोल शिवाजी शेळकेने काही एक कारण नसताना त्यांना तु मला धक्का का दिला असे म्हणुन शिवीगाळ केली. त्यांना लाकडी बांबुने मारहाण करून जखमी केले.

गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे (API Sonavane) करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | A lawyer was beaten with a wooden bamboo in Shukrawar Peth Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’; फडणवीसांपेक्षा, शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनेकडून जाहिरातबाजी

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प

Maharashtra Cabinet Decision | पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ